मुंबई- सलमान खानच्या मुख्य भूमिका असलेल्या दबंग आणि दबंग २ चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळालेल्या या यशानंतर आता दबंगचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे.
सलमानने आपल्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो अरबाज खानसोबत चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. दबंग ३ चित्रपटाच्या चित्रीकरणाला १ एप्रिलपासून सुरूवात होणार असून इंदौरमध्ये हे शूटींग होणार आहे. माझ्या आणि अरबाजच्या जन्मभूमीतच या चित्रपटाचे चित्रीकरण होत असल्याचे सलमानने यात सांगितले आहे.