मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या वर्षात सतत संकटे येत असल्याचेही तिने म्हटलंय.
भारताच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ बुधवारी वेगाने महाराष्ट्राच्या उत्तरी किनारपट्टीजवळ येत आहे. मुंबईच्या प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंक रोडचे छायाचित्र तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत अभिनेत्रीने लिहिले आहे. , "चक्रीवादळ निसर्ग, मुंबईत माझी आई आणि भाऊ यांच्यासह दोन कोटी लोकांचे घर आहे."
प्रियंका चोप्राचे सावध राहण्याचे आवाहन हेही वाचा - Live Update 'निसर्ग': थोड्याच वेळात अलिबाग किनारपट्टीवर धडकणार निसर्ग 'चक्रीवादळ'
प्रियंका म्हणाली, "मुंबईने १८९१ पासून तीव्र चक्रीवादळ अनुभवलेला नाही आणि जेव्हा जग इतके हताश आहे, तेव्हा ते विशेषतः विनाशकारी ठरू शकते."
प्रियंकाने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ची लिंक शेअर केली आहे, ज्यात मुंबईकरांनी यापुढे कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दल लिहिलेले आहे.
अलीकडेच भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, तीव्र चक्रीवादळ 3 जूनच्या दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर जोरदार हजेरी लावली जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी यापूर्वी अभिनेता विक्की कौशलने आपल्या बाल्कनीत बसून ढगांसोबतचा फोटो शेअर केला आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - 'निसर्ग' चक्रीवादळाची मुंबईकडे कूच, प्रशासनाचा रेड अलर्ट