महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बंटी और बबली 2' ची उत्सुकता वाढली, ट्रेलरनंतर नवे पोस्टर रिलीज - 'बंटी और बबली 2 ' 19 नोव्हेंबर रोजी रिलीज

बहुप्रतीक्षित 'बंटी और बबली 2' या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता नवे पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 2005 मध्ये आलेल्या बंटी और बबली या चित्रपटाचा हा सिक्वेल सिनेमा आहे.

'बंटी और बबली 2
'बंटी और बबली 2

By

Published : Oct 28, 2021, 10:16 PM IST

अभिनेता सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या बहुप्रतीक्षित 'बंटी और बबली 2' या चित्रपटाची प्रतीक्षा सुरू आहे. या चित्तरपचाटा नुकताच ट्रेलर रिलीज झाला होता. आता चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे एक पोस्टर निर्मात्यांनी प्रसिध्द केले आहे. या चित्रपटातून तब्बल 12 वर्षांनंतर सैफ अली खान आणि राणी मुखर्जी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात हरहुन्नरी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत.

'बंटी और बबली 2'चा ट्रेलर रिलीज

'बंटी और बबली 2'या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 2005 मध्ये आलेल्या बंटी और बबली चित्रपटात तरबेज चोरी करणारी जोडी दाखवण्यात आली होती. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचा 'बंटी और बबली 2' हा सिक्वेल आहे.

'बंटी और बबली 2' चित्रपटाची कथा मनोरंजक वाटते. सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी बंटी आणि बबली बनून पोलिसांना चक्रावून सोडतात. त्यामुळे पोलिसांना वाटते की जुने बंटी आणि बबली परत आले आहेत. पोलीस सैफ आणि राणीला अटक करतात. त्यानंतर सैफ आणि राणी एक जबरदस्त खेळी करतात आणि बंटी आणि बबलीची नावे वापरणाऱ्यांच्या शोधार्थ मोहीम उघडतात.'बंटी और बबली 2 ' 19 नोव्हेंबर रोजी देशभर चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सची आहे.

हेही वाचा - वरुण धवन होणार बाबा? चाहत्यांमध्ये आनंदाची लहर

ABOUT THE AUTHOR

...view details