मुंबई - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसाराचा फटका फिल्म आणि टीव्ही उद्योगाला बसला आहे. फिल्म, टीव्ही आणि डिजीटल शूटींग बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स एसोसिएशनने घेतला आहे. १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व शूटींग बंद राहणार आहेत.
कोरोनाचा कहर : ३१ मार्चपर्यंत फिल्म, टीव्ही आणि डिजिटल शूटींग बंद - फिल्म, टीव्ही आणि डिजीटल शूटींग बंद
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेत यापुढे ३१ मार्चपर्यंत सिनेमा, टीव्ही मालिका आणि डिजिटल वेब सिरीजचे शूटींग थांबवण्यात आले आहे. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स एसोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा कहर
सध्या अनेक चित्रपटांचे शूटींग भारतात आणि परदेशात सुरू आहेत. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स एसोसिएशनने निर्णय घेतल्यानंतर शूटींग सर्वांना पॅकअप करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
इंडियन फिल्म टीवी डायरेक्टर एसोसिएशनचे चेअरमन यांनी सांगितले, ''जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. आम्ही फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांची मिटींग घेतली. दीर्घ चर्चेनंतर १९ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत शूटींग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.''