मुंबई - देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आता याच विषयावर आधारित एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोना व्हायरस असे शीर्षक असलेल्या या सिनेमाची निर्मिती राम गोपाल वर्मा यांनी केली आहे. नुकताच या तेलुगू चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
भय इथले संपत नाही... 'कोरोना व्हायरस' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित - कोरोना व्हायरसवर आधारित चित्रपट
मंगळवारी राम गोपाल वर्मा यांनी या सिनेमाचा चार मिनिटांचा ट्रेलर आपल्या ट्विटरवर शेअर केला. हा संपूर्ण चित्रपट लॉकडाऊनदरम्यान शूट केला गेला आहे. यात लॉकडाऊनदरम्यान एका कुटुंबात घडणारी कथा मांडली गेली आहे. कोरोना व्हायरस आपल्या सर्वांमध्ये दडलेल्या भीतीची कथा आहे
मंगळवारी राम गोपाल वर्मा यांनी या सिनेमाचा चार मिनिटांचा ट्रेलर आपल्या ट्विटरवर शेअर केला. हा संपूर्ण चित्रपट लॉकडाऊनदरम्यान शूट केला गेला आहे. यात लॉकडाऊनदरम्यान एका कुटुंबात घडणारी कथा मांडली गेली आहे. देव असो वा कोरोना कोणीही आपलं काम थांबवू शकत नाही, असं ट्विट करत राम गोपाल वर्माने हा ट्रेलर शेअर केला आहे.
कोरोना व्हायरस आपल्या सर्वांमध्ये दडलेल्या भीतीची कथा आहे. यात कोरोना आणि मृत्यूची भीती विरुद्ध प्रेम आणि कुटुंब या गोष्टी दाखवल्या आहेत. कोरोना व्हायरस चित्रपटात श्रीकांत अय्यंगार यांची भूमिका आहे. तर, डीएसआरने सिनेमाला संगीत दिलं आहे. दरम्यान, या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.