नवी दिल्ली: स्टार कपल कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुरुवारी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे एका इंटिमेट सोहळ्यात लग्नगाठ बांधली. गेल्या अनेक दिवसापासून या लग्नाची चर्चा सर्व माध्यामात सुरू होती. दोघांनी लग्नगाठ बांधल्याची पुष्ठी झाली आहे. दरम्यान, विकी कौशलने कतरिनासाठी ७ लाखांची अंगठी घेतली आहे. विवाहप्रसंती कतरिनाने ही अंगठी घातली होती. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ही हिऱ्याची अंगठी असल्याचे समजते. तसेच तिच्या नेकलेसमध्ये एक निळ्या रंगाचा हिरा आहे. तिच्या अंगठीतील हिऱ्याची किंमत ९८०० अमेरिकन डॉलर असल्याची माहिती मिळत आहे.
जवळच्या सूत्रांनुसार, या जोडप्याने गुरुवारी दुपारी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत 'सात फेरे' घेतले.