महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांत आत्महत्या प्रकरण: करण जोहर, सलमानसह आठ जणांविरोधात तक्रार दाखल - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, आदित्य चोप्रा यांच्यासह आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बिहारमधील मुजफ्फरनगरमध्ये ही तक्रार केली गेली. या आरोपाची पुष्टी करण्यासाठी प्रमुख साक्षीदार म्हणून अभिनेत्री कंगना राणावत हिचे नाव लिहिण्यात आले आहे.

complaint filed against karan johar
सलमानसह आठ जणांविरोधात तक्रार दाखल

By

Published : Jun 17, 2020, 6:25 PM IST

मुंबई- सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, आदित्य चोप्रा यांच्यासह आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बिहारमधील मुजफ्फरनगरमध्ये ही तक्रार केली गेली. या आठ जणांनी संगनमत करून सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलेला आहे. बिहारमधील पेशाने वकील असलेल्या सुरज कुमार ओझा यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत या सगळ्यांनी मिळून सुशांतचे करिअर संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय या आरोपाची पुष्टी करण्यासाठी प्रमुख साक्षीदार म्हणून अभिनेत्री कंगना राणावत हिचे नाव लिहिण्यात आले आहे. करण जोहर, सलमान खान, एकता कपूर, संजय लीला भन्साळी हे कायमच स्टार किड्स असणाऱ्यांना आपल्या सिनेमात संधी देतात. त्यामुळे, एखादा साध्या कुटुंबातील मुलगा वर येत असल्याचे पाहून त्यांनी या इंडस्ट्रीत टिकण्याचे त्याचे सारे मार्ग बंद करून टाकले. यासाठी 7 चित्रपट त्याच्याकडून हिरावून घेतल्याचा तसेच त्याचा 'ड्राइव्ह' हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज करायला नकार दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावत हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यात बॉलिवूडमधील कंपूशाही आणि नेपोटीजम यावर तिने हल्ला चढवला होता. या व्हिडिओत तिने करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी यांची उघडपणे नावं घेतली होती. त्यामुळे, या प्रकरणातील सत्य समोर यावं आणि बॉलिवूडमधील ही मक्तेदारी संपुष्टात आणावी यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीमुळे फार काही सिद्ध होऊ शकणार नसलं, तरीही करण जोहर, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, सलमान खान, दिनेश विजन, आदित्य चोप्रा यांच्यासारख्या मोठ्या निर्मात्यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सुनावणी 3 जुलै रोजी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details