बंगळूरू- हरहुन्नरी युवा कन्नड अभिनेता संचारी विजय याला अखेर मृत घोषित करण्यात आले आहे. शनिवार १२ तारखेला त्याला मोटरसायकलवरुन घरी परतत असताना भीषण अपघात झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर तो ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केल्यानंतर कन्नडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोकलहर पसरली आहे.
असा झाला होता अपघात
अभिनेता संचारी विजय आणि त्याचा मित्र नवीन हे मोटरसायकलवरुन घरी परतत होते. यावेळी त्यांची मोटरसायकल घसरली आणि अपघात झाला. दोघांनीही हेल्मेट वापरले नसल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू झाले. त्याच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यामुळे, शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याचा मित्र नवीन याच्यावर उपचार सुरू असून त्याचा धोका टळला असल्याचे डॉक्टरनी सांगितले.
संचारी विजयचे होणार अवयवदान
संचारी विजय मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयचे भाऊ सिद्धेश कुमार यांनी माध्यमांना सांगितले होते की कुटुंबाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. “डॉक्टरांनी आम्हाला माहिती दिली आहे की त्याचा मेंदू मृत झाला असून तो रिकव्हर होण्याची शक्यता नाही. आपणा सर्वांना माहितच आहे की त्याने नेहमीच समाजाच्या उन्नतीसाठी काम केले आहे. त्याने कोविड -१९ साथीच्या काळात मदतकार्यासाठी चोवीस तास काम केले होते. म्हणून आम्ही त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा विश्वास आहे की यामुळे त्याला शांती मिळेल. तो मृत्यूनंतरही समाजाला मदत करत राहील. ज्यांनी त्याच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे प्रयत्न केले त्या प्रत्येकाचे आभार. ”
अल्पकाळात बहरलेली कारकिर्द