महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चाईल्ड ऑफ गॉड': सुशांतच्या आत्महत्येच्या एक महिन्यानंतर अंकिताची पहिली पोस्ट - सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाला आज महिना झाला

सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाला आज महिना झाला आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेने त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. अंकिताने आपल्या पोस्टमध्ये कुठेही सुशांतच्या नावाचा उल्लेख केलेला नसला तरी ही पोस्ट त्याच्यासाठीच आहे हे स्पष्ट होते. सुशांत आणि अंकिता यांनी सहा वर्षे डेटिंग केले होते.

'Child of God
चाईल्ड ऑफ गॉड

By

Published : Jul 14, 2020, 8:04 PM IST

मुंबई: गेल्या महिन्यात सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. आज त्याच्या मृत्यूला एक महिना होत असताना तिने लिहिलेली एक अध्यात्मिक पोस्ट लक्ष वेधणारी आहे.

अंकिता आणि सुशांत 2016 मध्ये विभक्त होण्याआधी सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. एकता कपूरच्या पवित्र रिश्ता मालिकेच्या सेटवर ते एकमेकांना भेटले. या शोमुळे सुशांत देशातील घरोघरी माहिती झाला आणि दोघांचे नातेही बहरत गेले होते.

आज सुशांतच्या जाण्याला एक महिना झाल्यावर अंकिताने इन्स्टाग्रामवर लिहिले: "चाइल्डऑफ गॉड" तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक दिवा दिसत असून त्याभोवती पांढरी फुले दिसतात. गणेश आणि साईबाबांची प्रतिमा फोटो फ्रेममध्ये दिसत आहे.

सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पवित्रा रिश्ता या मालिकेच्या प्रेक्षकांना त्यांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन जोडी पसंतीस पडली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने शोक व्यक्त केला होता.

हेही वाचा - बंद जागेत शूटिंग आणि डबिंग करणे धोक्याचे - शेखर कपूर

१४ जून रोजी सुशांतसिंह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्याम स्वामी यांनी त्याच्या मृत्यूच्या चौकशीमध्ये लक्ष घातले आहे. सीबीआय चौकशीसाठी हे प्रकरण योग्य आहे का याचा शोध घेण्यासाठी एका वकिलाची नेमणूक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details