मुंबई- श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मुख्य भूमिका असलेला 'छिछोरे' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. याआधी नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मैत्रीदिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये घट्ट मैत्रीची झलक पाहायला मिळते.
अनोळखी लोक जेव्हा आयुष्य बनतात, 'छिछोरे'चा ट्रेलर रिलीज - नितेश तिवारी
आयुष्यात येणारे निरनिराळ्या प्रकारचे आणि निरनिराळ्या स्वभावाचे लोक अनोळखी म्हणून आयुष्यात येतात आणि नंतर आयुष्य बनून जातात, याचीच झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
आयुष्यात येणारे निरनिराळ्या प्रकारचे आणि निरनिराळ्या स्वभावाचे लोक अनोळखी म्हणून आयुष्यात येतात आणि नंतर आयुष्य बनून जातात, याचीच झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. कॉलेजपासून सुरू झालेल्या या मैत्रीचा कधीही न संपणारा प्रवास, त्यात येणारे अनेक अडथळे, भावनिक क्षण आणि मित्रांची धमाल मस्ती या ट्रेलरमध्ये दिसते.
श्रद्धा आणि सुशांतचा हा चित्रपट प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल, असं हा ट्रेलर पाहता आपण म्हणू शकतो. कॉलेज आणि हॉस्टेल लाईफ जगलेल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील त्या खास दिवसांची आठवण करून देणारा हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.