मुंबई- बॉलिवूडमध्ये किंवा चित्रपटसृष्टीत अनेकदा चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवर क्लॅश पाहायला मिळतात. यातील काही कलाकार अगदी घट्ट मित्र असतानाही एकाच दिवशी आपले चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय यांनी का घेतला असावा, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. मात्र, आता चक्क श्रद्धा कपूरच्याच दोन चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर क्लॅश पाहायला मिळणार आहे.
श्रद्धाच्याच 'छिछोरे' अन् 'साहो'चा बॉक्स ऑफिस क्लॅश, पाहा काय म्हणाले दिग्दर्शक - कलेक्शन
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित सिनेमा साहो हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर याच दिवशी सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धाचा छिछोरे चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित सिनेमा साहो हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर याच दिवशी सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धाचा छिछोरे चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. या जबरदस्त क्लॅशवर आता छिछोरेचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बरं झालं असतं जर हा क्लॅश टाळणं शक्य झालं असतं. गेल्या १० महिन्यांपासून तुमचा चित्रपट एका अशा खास दिवशी प्रदर्शित होत असतो, जेव्हा इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाहीये. आणि मग रिलीजच्या एक महिन्यापूर्वी तुम्हाला समजतं, की या दिवशी प्रदर्शित होणारा हा एकच चित्रपट नाही, हे ऐकून तुम्ही नक्कीच नाराज होता. अशात दोन्ही चित्रपटांत मुख्य भूमिकेत श्रद्धा आहे, त्यामुळे या सिनेमांच्या कलेक्शनवरही याचा परिणाम होणार असल्याचे तिवारी यावेळी म्हणाले.