मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. आगामी 'छिछोरे' चित्रपटातून दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपासून चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं, अशात आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.
श्रद्धा-सुशांतच्या 'छिछोरे'चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित - कॉमेडी चित्रपट
आगामी 'छिछोरे' चित्रपटातून सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपासून चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं, अशात आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.
![श्रद्धा-सुशांतच्या 'छिछोरे'चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4004968-thumbnail-3x2-sh.jpg)
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाचं एक पोस्टर शेअर करत ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजेच ४ ऑगस्टला सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार असून याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
'छिछोरे' हा कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी हे करत आहेत. ३० ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूतशिवाय वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नविन पोलीशेट्टी, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला आणि प्रतिक बब्बरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.