मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूत लवकरच छिछोरे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार असून कॉलेजमधील मित्रांच्या एका ग्रुपवर या सिनेमाची कथा आधारित असणार आहे.
वो दिन, कॉलेजमधील दिवसांच्या आठवणीत रमलेल्या 'छिछोरें'चं गाणं प्रदर्शित - अमिताभ भट्टाचार्य
मिड लाईफमध्ये आल्यानंतर कॉलेज लाईफमधील मित्रांच्या आणि त्यांच्यासोबत केलेल्या मस्तीच्या आठवणीत बुडालेल्या सुशांतची झलक नव्या गाण्यात दिसते. वो दिन असं या गाण्याचं शीर्षक असून तुषार जोशीनं गाण्याला आवाज दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच या मैत्रीची झलक दाखवणारा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यानंतर सिनेमातील फिकर नॉट हे गाणंही प्रदर्शित झालं. आता कॉलेज लाईफमधील मित्र मिड लाईफमध्ये आल्यानंतर मित्रांच्या आणि त्यांच्यासोबत केलेल्या मस्तीच्या आठवणीत बुडालेले नव्या गाण्यात दिसतात.
वो दिन असं या गाण्याचं शीर्षक असून तुषार जोशीनं गाण्याला आवाज दिला आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. प्रत्येकाला आयुष्यातलं पहिलं प्रेम, कॉलेजमधील पहिल्या दिवसाची मैत्री आणि कॉलेज लाईफमधील मस्तीची आठवून करुन देणार हे गाणं प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकेल.