मुंबई -सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांची 'छिछोरे' गँग सिनेमागृहात झळकली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कॉलेजवयीन धम्माल पुन्हा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी ७.३२ कोटींची कमाई करणाऱ्या 'छिछोरे'च्या गल्यात दुसऱ्या दिवशी भर पडली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या आकड्यानुसार, 'छिछोरे'च्या कमाईत ६७.३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १२.२५ कोटीची कमाई केली आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटाची कमाई १९.५७ कोटी इतकी झाली आहे. विकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.