महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'छिछोरे'चा ट्रेलर आज होणार प्रदर्शित, पाहा झलक - बॉक्स ऑफिस

श्रद्धाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतचं तिनं चित्रपटाच्या सेटवरील टीमचा व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात चित्रीकरण करताना टीमची सुरू असलेली धमाल मस्ती पाहायला मिळत आहे.

'छिछोरे'चा ट्रेलर आज होणार प्रदर्शित

By

Published : Aug 4, 2019, 10:01 AM IST

मुंबई - श्रद्धा कपूर सध्या आपल्या 'छिछोरे' आणि 'साहो' या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. प्रेक्षक तिच्या या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता 'छिछोरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी आणि खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.

श्रद्धाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतचं तिनं चित्रपटाच्या सेटवरील टीमचा व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात चित्रीकरण करताना टीमची सुरू असलेली धमाल मस्ती पाहायला मिळत आहे. आज सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं श्रद्धानं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान 'छिछोरे' चित्रपटात श्रद्धाच्या अपोझिट अभिनेता सुशांत सिंग राजपूत झळकणार आहे. हा सिनेमा येत्या ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी श्रद्धा आणि प्रभासच्या मुख्य भूमिका असलेला 'साहो' चित्रपटही प्रदर्शित होणार असल्यानं या चित्रपटांची बॉक्स ऑफिस टक्कर पाहणं रंजक ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details