मुंबई - 'राजी' चित्रपटाद्वारे आपल्या दमदार दिग्दर्शनाची प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या मेघना गुलजार यांचा 'छपाक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
'छपाक' ट्रेलर : सद्य सामाजिक स्थितीवर आवाज बुलंद करणारी सत्यकथा - Deepika Padukon latest news
अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या आणि इतरांसाठी प्रेरणा बनलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित 'छपाक' हा चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिकाने लक्ष्मी यांची भूमिका साकारण्यासाठी 'मालती' नावाचे पात्र साकारले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
!['छपाक' ट्रेलर : सद्य सामाजिक स्थितीवर आवाज बुलंद करणारी सत्यकथा Chhapaak trailer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5328277-thumbnail-3x2-oo11.jpg)
'छपाक' चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकली आहे. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या आणि इतरांसाठी प्रेरणा बनलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिकाने लक्ष्मी यांची भूमिका साकारण्यासाठी 'मालती' नावाचे पात्र साकारले आहे.
अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यानंतर पुन्हा उमेदीने उभी राहणारी मालती दीपिकाने ताकतीने साकारल्याचे ट्रेलरमधून दिसते. सत्यकथेवर आधारित हा चित्रपट एक नवी सामाजिक जाणीवा देणारा आणि परिवर्तनाच्या वाटचालीतला महत्त्वाचा चित्रपट ठरू शकतो, हे ट्रेलर पाहून वाटते. १० जानेवारी २०२० ला 'छपाक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.