मुंबई - अभिनेता ताहिर राज भसीन म्हणतो की, तो तापसी पन्नूबरोबर 'लूप लपेटा' चित्रपटामध्ये काम करण्यास उत्सुक आहे. हा चित्रपट टॉम टायवर्सच्या 1998मधील जर्मन हिट 'रन लोला रन'चे भारतीय रूपांतर आहे.
३३ वर्षीय अभिनेता ताहिरचा 'छिछोरे' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. ताहिर म्हणाला, ''तापसी एक विलक्षण कलावंत आहे आणि त्यांची ऑनस्क्रीन जोडी नाविन्यपूर्ण ठरेल.''
"तापसी आणि मी पडद्यावर एक अनोखी आणि फ्रेश जोडी घेऊन येणार आहोत! तापसी एक अभूतपूर्व अभिनेत्री आहे आणि मी पाहिलेल्या तिच्या प्रत्येक चित्रपटात तिने बळकटी मिळवून दिली आहे," असे तो तापसीचे कौतुक करताना म्हणाला. 'लूप लपेटा' या चित्रपटाच्या कथानकात दोघांची जोडी कमाल करून दाखवेल, असा विश्वास त्याला वाटतो.
'रन लोला रन' हा जर्मन चित्रपट क्लासिक सिनेमामध्ये गणला जातो. याचे भारतीय रुपांतर 'लूप लपेटा' करण्यास उत्साही असल्याचे ताहिरने म्हटलंय.
हेही वाचा - करिना कपूर 'वन लव्ह' या बॉब मार्लेच्या नव्या आवृत्ती जागतिक कलाकारांसह झळकणार
"रन लोला रन हा एक वेगळ्या पठडीतला चित्रपट आहे. जेव्हा मी तो पहिल्यांदा पाहिला तेव्हा तेव्हा माझे डोकेच बधीर झाले होते. मूळ चित्रपटात जे मला सर्वाधिक आवडले, ते म्हणजे हटके स्टोरी, पात्रांचा लूक आणि अफलातून पार्श्वसंगीत.", असे ताहिरने सांगितले.
"या चित्रपटाच्या भारतीय रुपांतरात मी असेन याची कल्पनादेखील मी केली नव्हती आणि या विचाराने मला किक् बसली आहे. मी याला रुपांतर म्हणेन, रिमेक नाही. कारण यात भारतीय संदर्भ आणि आजच्या काळासाठी सुसंगत आहे.", असे तो म्हणाला.
ताहिर राज भसीन हा आगामी रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या कबीर सिंग दिग्दर्शित '83' या चित्रपटात झळकणार आहे. 1983मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकावर आधारित हा चित्रपट आहे. यात तो सुनील गावस्कर यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट यंदा ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे.