महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरिओग्राफर सरोज खान यांनी घेतला जगाचा निरोप, बॉलिवूडवर शोककळा

बॉलिवूडच्या ख्यातनाम कोरिओग्राफर सरोज खान यांनी शुक्रवारी पहाटे १ वाजून ४५ मिनीटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वासाचा त्रा होत असल्यामुळे १७ जून रोजी मुंबईच्या गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सरोज यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोकलहर पसरली आहे. अनेक सिनेतारकांनी सरोज खान यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

Saroj Khan death
कोरिओग्राफर सरोज खान

By

Published : Jul 3, 2020, 2:43 PM IST

मुंबई - तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि २००० गाण्यांची कोरिओग्राफी केलेल्या ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनी आज जगाचा निरोप घेतला. सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे १ वाजून ४५ मिनीटांनी निधन झाले. 'मास्टर'जी या नावाने फिल्म इंडस्ट्रीत सुपरिचीत असलेल्या सरोज यांच्या निधनाने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोकलहर पसरली आहे. अनेक तारे तारकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

अभिनेता अक्षय कुमारने लिहलंय, "दुःखद बातमीने सकाळ उजाडली. महान कोरियोग्राफर # सरोजखान राहिल्या नाहीत. त्यांनी नृत्य सोपे केले. इंडस्ट्रीसाठी मोठे नुकसान आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

अभिनेत्री निमरत कौरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सरोज खान यांचा एक फोटो शेअर केलाय. सरोज यांनी माझ्या आयुष्यात कोरिओग्राफर या शब्दाची ओळख करुन दिली, असे निमरत यांनी म्हटलंय.

अभिनेत्री मनीषा कोइरालाने लिहिलंय, "लहानपणापासूनच मला भारतीय शास्त्रीय नृत्याचे शिक्षण दिले गेले होते. या त्या होत्या ज्यांनी मला सिनेमात आल्यानंतर फिल्मी नृत्य शिकवले.(जे मला येत नव्हते) एक टफ टास्क मास्टर आणि एक महान !!'

हेही वाचा - छोट्या भेटीतही सनी लिओनीने गिरवले होते सरोज खान यांच्याकडून लोकनृत्याचे धडे

अभिनेता आशिष विद्यार्थीने ट्विटरच्या माध्यमातून सरोज खान यांच्याबद्दल शोक व्यक्त केलाय.

दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलंय, "सरोज खान माझ्या प्रेमळ मास्टरजी. म्यूझिक व्हिडिओपासून सिनेमापर्यंतचा आमचा प्रवास लांबचा ठरला. आता तुम्ही मला एकटे सोडले आणि निघून गेलात. तुमच्यासोबत एके दिवशी जे बोललो होतो ते करीन. माझे तुम्हाला वचन आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details