मुंबई- अभिनेत्री परिणीती चोप्रा आज गुरुवारी आपला वाढदिवस साजरा करीत आहे. हा दिवस तिच्यासाठी आणखी खास बनवण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परिणीतीची चुलत बहीण प्रियंका चोप्रा जोनास हिने दोघींचा फोटो शेअर करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता आयुष्मान खुरानाने आपल्या 'मेरी प्यारी बिंदू' चित्रपटातील सहकलाकार परिणीती हिला इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्यात. अभिनेत्री अथिया शेट्टीनेही परिणीतीच्या या खास दिवशी प्रेम, 'रोशनी' आणि 'उमंग' यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'जबरीया जोडी' आणि 'हंसी तो फांसी' या चित्रपटात परिणीतीसोबत भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रानेही सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या आहेत.