महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अन्नाला धर्म नसतो', झोमॅटोच्या या वाक्यावर कलाकारांची प्रतिक्रिया

एका ग्राहकाने डिलिवरी बॉयकडून जेवण घेण्यास नकार दिला होता, कारण तो हिंदू नव्हता. याबद्दल या ग्राहकाने ट्विटरवरून झोमॅटोकडे तक्रार केली. ज्याचं जोरदार प्रतिउत्तर झोमॅटोनं दिलं. अन्नाचा कोणताही धर्म नसतो, अन्न स्वतःच एक धर्म आहे, असं झोमॅटोनं म्हटलं

झोमॅटोच्या या वाक्याला कलाकारांची सहमती

By

Published : Aug 1, 2019, 3:11 PM IST

मुंबई- झोमॅटो हे ऑनलाईन अॅप पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र, यावेळी एका सकारात्मक गोष्टीमुळे, एका ग्राहकाने डिलिवरी बॉयकडून जेवण घेण्यास नकार दिला होता, कारण तो हिंदू नव्हता. याबद्दल या ग्राहकाने ट्विटरवरून झोमॅटोकडे तक्रार केली. ज्याचं जोरदार प्रतिउत्तर झोमॅटोनं दिलं.

अन्नाचा कोणताही धर्म नसतो, अन्न स्वतःच एक धर्म आहे, असं झोमॅटोनं म्हटलं. झोमॅटोच्या या ट्विटवर कंपनीचे मालक दीपेंद्र गोयल यांनी प्रतिक्रिया देत आम्हाला भारताच्या विचाराचा आणि देशातील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या विविधतेचा अभिमान आहे. आमच्या या विचारसरणीमुळे जर कंपनीचं काही नुकसान होत असेल तर याचं अजिबातही दुःख आम्हाला होणार नाही. झोमॅटोच्या या उत्तरानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आणि अनेक कलाकारांनीही झोमॅटोच्या या विचारांचं समर्थन केलं.

नुकतंच स्वरा भास्करनंही ट्विट करत म्हटलं, की हे संपूर्ण संभाषण वाचून माझ्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, की अजूनही काही लोकांमध्ये या प्रकारची हिम्मत बाकी आहे. तर अभिनेत्री रिचा चड्ढानेही ट्विट करत त्या ग्राहकाला म्हटलं, की जास्त द्वेष करू नये, त्यानं अॅसिडीटी होते. थंड रहा, जे खायचंय ते खा. जगजाहीर कशाला करतोस. ट्विटरवर ताट आणि चमचा घेऊन गोंधळचं होतो. मात्र, वास्तवात ताट आणि चमचाही नाही मिळत खाण्यासाठी.

ABOUT THE AUTHOR

...view details