मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआय गेल्या महिनाभरापासून तपास करत आहे. मात्र, अद्यापही सीबीआयच्या हाती सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू कशामुळे झाला, यासंदर्भात कुठलेही ठोस पुरावे लागलेले नाहीत. पुढील तपासासाठी सीबीआयचे पथक पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहे. तर, आता दिशा सालीयन प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशी? अद्याप अधिकृत दुजोरा नाही - disha salian case
दिशाच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या होणाऱ्या पतीची चौकशी करण्यात यावी, अशी राजकीय नेत्यांकडून मागणी केली जात होती. मात्र, यासंदर्भात सीबीआय चौकशी होणार का? याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
सुशांतसिंहने 14 जूनला आत्महत्या केली होती. त्यापूर्वी 8 जूनला सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिनेही आत्महत्या केली होती. दिशाच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या होणाऱ्या पतीची चौकशी करण्यात यावी, अशी राजकीय नेत्यांकडून मागणी केली जात होती. तर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मात्र, यासंदर्भात सीबीआय चौकशी होणार का? या बद्दल अद्यापकुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
तथापि, दिशा सालीयन हिचे वडील सतीश सालियन यांनी माध्यमे आणि राजकीय मंडळींविरोधात 14 ऑगस्टला मालवणी पोलिसांकडे तक्रार दिली होती. दिशाच्या आत्महत्या संदर्भात मुंबई पोलिसांनी केलेला तपास हा आमच्यासाठी समाधानकारक असून आमची कोणाही विरोधातही तक्रार नाही. दिशाच्या मृत्यूसंदर्भात नाहक बदनामी केली जात असल्याचे सतीश सालीयन यांनी तक्रारीत म्हटले आहे.