महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांतला ठेवलेल्या शवाघरात रिया चक्रवर्तीला कसा मिळाला प्रवेश? सीबीआय करणार चौकशी - reha chakraborty CBI

सुशांतच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवशी कूपर रुग्णालयातील शवागृहात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीही गेली होती, असे तपासात समोर आले आहे. शवागृहासारख्या ठिकाणी पोलीस किंवा कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना परवानगी नसताना आत जाता येत नाही. असे असतानाही रिया चक्रवर्तीने त्या ठिकाणी 45 मिनिटात कशी काय घालवली? याचा तपास करण्यासाठी सीबीआयकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

CBI orders inquiry to find out how reha chakraborty visited Mortuary where sushant's body was kept
सुशांतला ठेवलेल्या शवाघरात रिया चक्रवर्तीला कसा मिळाला प्रवेश? सीबीआय करणार चौकशी

By

Published : Aug 27, 2020, 12:01 AM IST

मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयचे पथक तपास करीत आहे. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवशी कूपर रुग्णालयातील शवागृहात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीही गेली होती, असे तपासात समोर आले आहे.

रुग्णालयाच्या शवागृहात रिया चक्रवर्ती हिने तब्बल 45 मिनिटात घालवली होती. शवागृहासारख्या ठिकाणी पोलीस किंवा कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना परवानगी नसताना आत जाता येत नाही. असे असतानाही रिया चक्रवर्तीने त्या ठिकाणी 45 मिनिटात कशी काय घालवली? याचा तपास करण्यासाठी सीबीआयकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी लवकरच सीबीआयकडून कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता व सुशांत सिंग च्या पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी केली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला कारणे दाखवा नोटीसही पाठवली जाणार आहे. रिया चक्रवर्ती ही तब्बल 45 मिनिटे सुशांतच्या मृतदेहाजवळ उभी होती आणि याची माहिती पोलिसांना होती का? याचाही तपास सीबीआयकडून केला जाणार आहे.

हेही वाचा :'गरज पडल्यास रिया चक्रवर्ती तिच्या रक्ताचे नमुने देण्यास तयार'

ABOUT THE AUTHOR

...view details