मुंबई- दिवंगत अभिनेता आसिफ बसरा २००७मध्ये इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या जब वी मेट चित्रपटात दिसले होते. स्टेशनवरील एका विक्रेत्याची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांची भूमिका छोटी होती, मात्र अजूनही ती लोकांच्या स्मरणात आहे. छोटीशी भूमिकाही उत्तम करण्याचा आणि त्याच्यात प्राण फुंकण्याची क्षमता आसिफ यांच्यात होती, असे इम्तियाज यांनी म्हटले आहे.
इम्तियाज म्हणतात, "माझ्यासाठी असिफ एका खास चित्रपटाचा एक खास भाग आहेत. ते एक हुशार अभिनेता होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने आतून हादरलो आहे. ते एक कुशल कलाकार होते. त्यांच्याबरोबर काम करणे सोपे होते. त्यांच्या जाण्याने खरोखर नुकसान झाले आहे. "
हेही वाचा - मल्टिप्लेक्स, नाट्यगृहाच्या करमणूक शुल्क वाढीला स्थायी समितीचा विरोध, करवाढ तूर्तास टळली
ते म्हणाले, "मला आठवतेय, 'जब वी मेट' बनवताना मी एक कुशल अभिनेता शोधत होतो. मला काय सांगायचे आहे हे ज्याला कळेल आणि ते पडद्यावर दिसेल, अशा अभिनेत्याचा शोध मी घेत होतो. मी त्या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून दोन गोष्टी दाखवू इच्छित होतो, एक दुष्ट आणि दुसरी विचित्र व्यक्ती. व्यक्तीरेखेच्या माध्यमातून मला भीतीही निर्माण करायची होती आणि दिसायलाही मजेदार हवे होते. ही भूमिका साकारण्यासाठी मला एका कुशाग्र अभिनेत्याची गरज होती, ज्याला डोके असेल आणि व्यक्तीरेखा साकारण्याची क्षमताही असेल."
हेही वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी सनी लिओनिचा ट्रान्सपरंट उपाय
इम्तियाज अली यांनी पुढे सांगितले, "मी आसिफ यांना मुंबईतील थिएटरच्या माध्यमातून ओळखतो. त्या कारणामुळे आम्ही भेटलो. 'जब वी मेट' पासून आम्ही एकत्र काम केले नाही. पण मी त्याचे बाकीचे चित्रपट पाहिले आहेत. ते एक असे अभिनेता होते, ज्यांनी प्रेक्षकांना आपल्या कलात्मकतेने पडद्याशी जोडून ठेवले. "