मुंबई - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची अडचण वाढली आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिने २४ लाख रुपये घेतले होते. मात्र ती कार्यक्रमाला हजर राहिली नाही. यामुळे तिच्यावर फसवणूक केल्याचा गुन्हा उत्तर प्रदेशातील कटघर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. तिच्या विरोधात कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या घरी पोलीस दाखल, २४ लाख रुपयांना फसवल्याचा दावा
सोनाक्षी सिन्हाने एका कार्यक्रमासाठी २४ लाख रुपये घेतले मात्र ती कार्यक्रमालाच पोहोचली नाही. यामुळे तिच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. याच्या तपासासाठी युपी पोलीस मुंबईत सोनाक्षीच्या घरी दाखल झाले. मात्र ती घरी नसल्यामुळे पोलीसांना चौकशी न करताच परतावे लागले.
उत्तर प्रदेशातील मोरादाबादचे पोलीस या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. पोलिसांनी जुहू येथील सोनाक्षीच्या घराला भेट दिली. मात्र ती घरी नसल्यामुळे त्यांना खाली हात परतावे लागले. जुहू पोलीसांच्या सहकार्याने युपी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. सोनाक्षीचा जवाब घेण्यासाठी पोलीस अजून मुंबईतच थांबले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षीची भेट घेण्यासाठी पोलीस आज पुन्हा प्रयत्न करतील.
सोनाक्षीवर लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असून तिला बदनाम करण्याचा हा हेतू असल्याचे तिच्या मॅनेजमेंटचे म्हणणे आहे. सोनाक्षी सध्या हैदराबादमध्ये सलमन खानसोबत 'दबंग ३' चे शूटींग करीत असल्याचे समजते.