'बंटी और बबली 2' हा २००५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पहिल्या भागातील बंटी आणि बबली यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. 'बंटी और बबली २' या चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित झाली आहे.
'या' तारखेला धुमाकूळ घालणार नवा 'बंटी' आणि नवी 'बबली' - Bunty Aur Babli sequel release date finalized
'बंटी और बबली २' चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येत असून याच्या रिलीजची तारीख ठरली आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि श्रावणी यांच्या मुख्य भूमिका असतील.
या चित्रपटात सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि नवीन तारका श्रावणी यांच्या मुख्य भूमिका असतील. हा चित्रपट २६ जून २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
आदित्य चोप्राने निर्माण केलेल्या 'बंटी और बबली' चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी यांच्या आघाडीच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. बंटी और बबलीमधील अलिशा चिनॉयने म्हटलेले व ऐश्वर्या रायने नाच केलेले 'कजरा रे' हे गाणे २००५ मधील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक होते.'बंटी और बबली २' या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण शर्मा करत आहेत. सुल्तान आणि टायगर जिंदा है या चित्रपटाचे सहदिग्दर्शन वरुण शर्मा यांनी केले होते. आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या आदित्य 'बंटी और बबली २' या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात झाली आहे
TAGGED:
ENT NEWS 1