मुंबई- अभिनेता सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि नवोदित शर्वरी यांनी 'बंटी और बबली 2' या आगामी चित्रपटासाठीचे डबिंग पूर्ण केले आहे.
याबद्दल बोलताना दिग्दर्शक वरुण व्ही. शर्मा म्हणाले, "सर्व कलाकारांनी चित्रपटासाठीचे डबींग पूर्ण केले आहे. 'बंटी और बबली २' हा एक मोठा आनंददायी, मनोरंजक चित्रपट आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट दाखवण्यासाठी आम्ही उतावीळ झालो आहोत.
'बंटी और बबली २' चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जी पुन्हा एकत्र काम करीत असून त्यांना ओरिजनल बंटी आणि बबली म्हणून सादर करण्यात आले आहे. 'हम तुम' आणि 'ता रा रम पम' सारख्या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे.
सिद्धांतने यापूर्वी सांगितले होते की बंटी और बबली 2 चा भाग होण्यासाठी तो खूप उत्साही आहे.
"मी लोकांनी हा चित्रपट पाहावा यासाठी उत्साहित आहे.मला वाटते सध्याच्या साथीनंतर या चित्रपटामुळे सर्व काही अलबेल होईल, कारण हा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. हा मस्त सिनेमा आहे. मला शूटिंग करताना खूप मजा आली आणि सध्याच्या या कठिण काळानंतर लोकांना हलके फुलके आवश्यक असणार आहे. मी चित्रपटासाठी खूपच एक्सायटेड झालो आहे.,'' असे सिध्दांत म्हणाला.