मुंबई - गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात बऱ्याच चित्रपटांनी प्रदर्शनासाठी ओटीटीची कास धरली. त्यातील पहिल्या काही चित्रपटांमध्ये होता अनुष्का शर्माची निर्मिती असलेला चित्रपट ‘बुलबुल’. काही दशकांपूर्वीपर्यंत बालवधू घरांमध्ये आणल्या जायच्या आणि मुलीचे माता-पिता तिला सरासरी पाठवण्यात धन्यता मानायचे. याच बालविवाह व बालवधू समस्येवर आधारित ‘बुलबुल’ होता व प्रमुख भूमिकेत होती अभिनेत्री तृप्ती डिमरी. सनी व बॉबी देओल अभिनित व श्रेयस तळपदे दिग्दर्शित ‘पोस्टर बॉईझ’ मधून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या, तृप्ती डिमरीने, इम्तियाज अली निर्मित ‘लैला मजनू’ मध्ये प्रमुख भूमिका केली होती व तिच्या अभिनयाची स्तुती झाली होती परंतु ‘नाव’ झाले नव्हते. ‘बुलबुल’ मधील भूमिकेमुळे तिला लोकं ओळखायला लागलेत व फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिला चांगले चित्रपट ऑफर होताहेत.
अभिनेत्री तृप्ती डिमरी म्हणाली, “‘बुलबुल’ ने माझे आयुष्यच बदलून टाकले”! - अभिनेत्री तृप्ती डिमरी बद्दल बातमी
‘बुलबुल’ ने माझे आयुष्यच बदलून टाकले, असे अभिनेत्री तृप्ती डिमरी म्हणाल्या. गा चित्रपट बालविवाह व बालवधू समस्येवर आधारित होता.

गेल्या वर्षी तिच्या नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून, तृप्ती दिमरीला अभिनेत्री म्हणून गांभीर्याने पाहिले जात आहे. ‘आता लोक मला अधिक सन्मानाने वागवतात’, मिस डिमरी म्हणाली. तिने आपली दिग्दर्शिका अन्विता दत्तच्या मदतीने या भूमिकेच्या अंतरंगात कसा प्रवेश केला याबद्दल सांगितले. ‘प्रत्येक कलाकार चुकीतून शिकतो व ती ‘लक्झरी’ त्याला हवी असते. अन्विताने ती लक्झरी मला दिली होती. विटा रचत एखादी बिल्डिंग बनवावी तसे आम्ही दोन महिने मेहनत घेत या भूमिकेची इमारत उभी केली’ तृप्ती म्हणाली.
तृप्तीला या विषयासंबंधी फारसे माहित नव्हते व त्यातच काही ‘अवघड’ दृश्ये चित्रित करायची होती, त्याबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘बालवधू या विषयाचा मी संशोधित अभ्यास केला व मानसिक आणि भावनिक गुंतागुंत समजावून घेतली. मानसिक गुदमरता काय असते याबद्दल ‘बुलबुल’ कसा विचार करेल याबद्दल एक आलेख आखला. मी लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराच्या दृश्यांना घाबरत होते. अन्विताला माझ्या शरीरातून जिवंतपण गायब झाल्याचे दाखवायचे होते. खूप कठीण होतं सगळं, पण अन्विता व राहुल बोस सरांना सलाम, त्यांनी सांभाळून घेतलं. ‘अवघड’ दृश्यानंतर राहुल सर वेगळाच विषय काढून माझे लक्ष दुसरीकडे फिरवायचे जेणेकरून त्या सीन चा मला त्रास होऊ नये. हे सर्व सीन्स चित्रपटाचे ‘टर्निंग पॉईंट्स’ होते. ‘रेप सीन’ नंतर तर मी वीसेक मिनिटं आक्रंदत होते व अन्विताने मला मिठीत घेऊन सांत्वन केले.’ तृप्ती डिमरी धर्मा प्रॉडक्शनच्या पुढील एका चित्रपटासाठी करारबद्ध झाली असल्याचं कळते आहे.