मुंबई - बॉलिवूडचे दोन अॅक्शन स्टार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ लवकरच वॉर सिनेमात एकत्र झळकणार आहे. या दोघांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मात्र, या सिनेमाची टक्कर अमिताभ बच्चन यांच्या सिनेमासोबत होणार असल्याने हृतिकसमोर हे मोठं आव्हान असणार आहे.
बॉक्स ऑफिसवर अमिताभ अन् हृतिकमध्ये टक्कर, हे चित्रपट होणार एकाच दिवशी प्रदर्शित
हृतिक आणि टायगरचा अॅक्शन थ्रिलर वॉर सिनेमा २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर याच दिवशी अमिताभ यांचा तगडी स्टारकास्ट असलेला सैरा नरसिम्हा रेड्डी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.त्यामुळे हृतिकसाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
हृतिक आणि टायगरचा अॅक्शन थ्रिलर वॉर सिनेमा २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर याच दिवशी अमिताभ यांचा तगडी स्टारकास्ट असलेला सैरा नरसिम्हा रेड्डी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असणार असून यात स्वातंत्र्य सैनिक नरसिम्हा रेड्डी यांची कथा पाहायला मिळणार आहे.
सुरेंद्र रेड्डी यांनी सैरा चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होईल. तर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी वॉर चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.