मुंबई- बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन सर्वांसाठीच एक धक्का होता. कलाविश्वातून आजही याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. अशात कुटुंबीय ही घटना कसे विसरू शकतील. नुकतंच एका शोमध्ये हजेरी लावली असता बोनी कपूरदेखील श्रीदेवींच्या आठवणीत भावूक झाले.
मला माझ्या चुकांची जाणीव आहे, श्रीदेवींच्या आठवणीत भावूक झाले बोनी कपूर - komal nahta
असा एकही क्षण नसतो जेव्हा श्रीदेवींना विसरणं शक्य होतं, असं सांगताना बोनी कपूर यांना अश्रू अनावर झाले. आयुष्यात माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्याची जाणीव मला आहे.
असा एकही क्षण नसतो जेव्हा श्रीदेवींना विसरणं शक्य होतं, असं सांगताना बोनी कपूर यांना अश्रू अनावर झाले. आयुष्यात माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्याची जाणीव मला आहे. मात्र, अशा वेळेत जर तुमच्या पत्नीचा तुम्हाला पाठिंबा मिळाला नाही तर तुम्ही काहीही करू शकत नाही, असेही बोनी कपूर यावेळी म्हणाले.
श्रीदेवींना विसरणं आपल्यासाठी अशक्य असल्याचं बोनी कपूर यांनी यावेळी म्हटलं. चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी कोमल नाहटा और एक कहानी या कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीत बोनी कपूर बोलत होते. रविवारी या कार्यक्रमाचा हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.