मुंबई- आदित्य चोप्रा यांचं दिग्दर्शन असलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटात अनुपम खेर यांनी राज म्हणजेच शाहरूखच्या वडिलांचे पात्र साकारले होते. या जोडीला आजही प्रेक्षक तितकेच मिस करतात.
अनुपम यांच्या 'त्या' ट्विटवर शाहरूख म्हणतो, 'दिल तो बच्चा हैं जी'! - DDLJ
दोघांचे चित्रपटातील विनोद आणि वडिल मुलाच्या नात्यातील बंध प्रेक्षकांची मने जिंकणारे होते. आता केवळ प्रेक्षकच नव्हे तर खुद्द अनपुम खेर देखील हे दिवस मिस करत आहेत
दोघांचे चित्रपटातील विनोद आणि वडिल मुलाच्या नात्यातील बंध प्रेक्षकांची मने जिंकणारे होते. आता केवळ प्रेक्षकच नव्हे तर खुद्द अनपुम खेर देखील हे दिवस मिस करत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, प्रिय शाहरूख, अचानकच न्यूयॉर्कमध्ये तुझी आठवण झाली. आपण काही उत्तम वेळ सोबत घालवला आहे, पण आता आपण मोठे झालो.
अनुपम यांच्या या ट्विटला उत्तर देत शाहरूखने म्हटलं, अरे नहीं डॅडी कूल, मोठे होवोत आपले शत्रू. हम दोनो का दिल तो बच्चा हैं जी! लवकरच घरी परत या आपण पुन्हा एकदा आपल्या खेळांना सुरूवात करूया. शाहरूख आणि अनुपम खेर यांनी आतापर्यंत 'कुछ कुछ होता हैं', 'जब तक हैं जान', 'वीर जारा' आणि 'हॅपी न्यू ईअर'सारख्या चित्रपटांत स्क्रीन शेअर केल्या आहेत.