महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूडची क्वीन दीपिका पदुकोणने शकुन बत्राच्या चित्रपटासाठी डबिंग केले सुरू! - शकुन बत्रा सिनेमा डबिंग

अभिनेत्री दीपिका पदुकोणने शकुन बत्राच्या चित्रपटासाठी डबिंग सुरू केले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून तिचे (किंबहुना बहुतेक सर्वच कलाकारांचे) चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. लॉकडाऊनच्या काळात दीपिका शकुन बत्राच्या चित्रपटासाठी, आधी गोवा आणि नंतर अलिबाग येथे, शूटिंग करीत होती. आता हा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शन स्थितीत असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण

By

Published : Nov 27, 2021, 4:06 PM IST

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यापासून मनोरंजनसृष्टी अपेक्षेप्रमाणे भरपूर वेगाने कामे करतेय. अनेक कलाकार व्यस्त झाले असून अभिनेत्री दीपिका पदुकोणने शकुन बत्राच्या चित्रपटासाठी डबिंग सुरू केले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून तिचे (किंबहुना बहुतेक सर्वच कलाकारांचे) चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. लॉकडाऊनच्या काळात दीपिका शकुन बत्राच्या चित्रपटासाठी, आधी गोवा आणि नंतर अलिबाग येथे, शूटिंग करीत होती. आता हा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शन स्थितीत असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

जवळपास एक दशकापासून बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण चाहत्यांना नेहमीच खास देत असते. तिचे चाहते ती पडद्यावर येण्यासाठी उत्सुकतेने वाट बघत आहेत. अत्यंत व्यस्त असणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीने नुकतेच शकुन बत्राच्या चित्रपटासाठी डबिंग सुरू केले आहे, ज्यामध्ये अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहेत.

दीपिका तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटासाठी तिने खास प्रशिक्षकाकडून योगाभ्यासाचे धडे घेतले. चित्रपटाचे अन्य तपशील गुप्त ठेवण्यात आले असले तरी 'प्रेम, मैत्री आणि आयुष्यभराच्या आठवणी' असा चित्रपटाच्या शूटिंगपासूनचा तिचा प्रवास या अभिनेत्रीने व्यक्त केला आहे. हा चित्रपट वास्तववाद आणि स्तरित कथानाकपूर्ण असून दीपिकाने शकुनच्या चित्रपटाच्या डबिंग स्टुडिओमध्ये जाताना छायाचित्रकारांना हसत पोझ दिली. दीपिकाने सोशल मीडियावर याआधीही तिच्या सह-कलाकारांसह बरेच फोटो केले होते आणि आता एक गोड कॅप्शन पोस्ट केले आहे, ‘चित्रपट संपू नये असे आम्हाला वाटत होते’.

दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट ‘फायटर’असून तिची जोडी हृतिक रोशनसोबत आहे. तसेच तिच्या बनत असलेल्या चित्रपटांमध्ये प्रभाससोबत नाग अश्विनचा पॅन इंडिया चित्रपट, अमिताभ बच्चन सोबत ‘द इंटर्न’चा अधिकृत हिंदी रिमेक, महाभारत आणि 83 यांचा समावेश आहे. दीपिका एका हॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे, ज्याची घोषणा या वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details