मुंबई - 'होळी' म्हणजे रंगाचा सण. बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये होळीचे रंग मनसोक्त उधळले गेले आहेत. या दिवशी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडकरांनी मनसोक्त उधळले होळीचे रंग; सोशल मीडियावर दिल्या शुभेच्छा - माधुरी दिक्षित
बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये होळीचे रंग मनसोक्त उधळले गेले आहेत. या दिवशी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडकरांनी मनसोक्त उधळले होळीचे रंग
माधुरी दिक्षित, अक्षय कुमार, हेमा मालिनी, ह्रतिक रोशन, यांनी ट्विटरवरुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'ही होळी तुमच्या आयुष्यात आणखी नवनवे रंग घेऊन येवो', असे ट्विट अक्षय कुमारने केले आहे.
ह्रतिकनेही सर्वांना होळी आनंदाची आणि सुखाची जावो, असे म्हणत ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
या कलाकारांसोबतच इमरान हाश्मी, मधुर भांडारकर, ईशा देओल, अरबाज खान यांनीही सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.