मुंबई- चालू वर्ष २०२१ हे बॉलीवूड चित्रपटांच्या दृष्टीने काही विशेष ठरले नसेल, पण या वर्षी अनेक स्टार्स कोरोनाच्या छायेत स्थिरावले. त्यामुळे अनेकांना त्यांच्या कामाच्या आधारे सन्मानितही करण्यात आले. कोरोना विषाणूमुळे, 'पद्मश्री पुरस्कार 2020' चालू वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला होता. भारताचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अनेक क्रीडा, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींना राष्ट्रपती भवनात या पुरस्काराने सन्मानित केले. जग आता नवीन वर्ष 2022 ची आतुरतेने वाट पाहत आहे. चालू वर्ष २०२१ संपायला फक्त एक आठवडा उरला आहे. अशा परिस्थितीत, आम्ही त्या बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊयात ज्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार (2020) ने सन्मानित करण्यात आले.
करण जोहर
प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर यांना 2020 या वर्षासाठी चित्रपट क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना करण जोहरने ट्विट केले होते की, "माझ्याकडे शब्दांची कमतरता असते असे अनेकदा होत नाही, पण हा असा प्रसंग आहे... पद्मश्री. देशातील नागरी पुरस्कारांमधील एक मिळण्यासाठीचा हा असा सन्मान. मी सध्या खूप भावनांनी भारावून गेलो आहे. नम्र, उत्साही आणि दररोज तुमची स्वप्ने जगण्याची, तयार करण्याची आणि मनोरंजन करण्याच्या संधीबद्दल कृतज्ञ. मला माहित आहे की माझ्या वडिलांना अभिमान वाटेल आणि हा क्षण शेअर करण्यासाठी माझ्यासोबत ते आले असते तर किती बरे झाले असते."
कंगना रणौत
बॉलीवूडची 'क्वीन' कंगना रणौतलाही २०२० चा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. कंगना एक चित्रपट अभिनेत्री असण्यासोबतच चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून देखील काम करत आहे. त्याचवेळी कंगना राणौतला या वर्षीचा चौथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि जेव्हा तिला पद्मश्री मिळाल्याचीही माहिती मिळाली तेव्हा ती खूश झाली. पद्मश्री मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना कंगना रणौत म्हणाली, "मला खूप नम्र आणि सन्मानित वाटत आहे. या सन्मानासाठी मी माझ्या देशाचे आभार मानते आणि स्वप्न पाहण्याची हिम्मत करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मी तो समर्पित करते."
एकता कपूर
टीव्हीची 'क्वीन' आणि निर्माती एकता कपूरलाही कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने (2020) सन्मानित करण्यात आले. एकताने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'नम्र आणि भारावून गेले आहे, मी फक्त 17 वर्षांची असताना इंडस्ट्रीत प्रवेश केला. मी सतत ऐकत आले की मी खूप लहानआहे, खूप कच्ची आहे आणि गोष्टींच्या सुरुवातीलाच उतावीळ आहे. वर्षानुवर्षे मला हे समजले आहे की माझी स्वप्ने पूर्ण करणे 'खूप लवकर' नसते आणि 'खूप तरुण' असणे ही कदाचित सर्वात चांगली गोष्ट आहे. आज मला चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने - 'पद्मश्री' ने सन्मानित करण्यात येणार असल्याने मला खूप आनंद झाला आहे.