महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिजीत भट्टाचार्यांच्या 'या' सुप्रसिद्ध गाण्यावरून तरुणाने तयार केलं कोरोना सॉन्ग, व्हिडिओ व्हायरल - Tejas Gambhir song viral

हा व्हिडिओ जेव्हा खुद्द अभिजीत भट्टाचार्य यांनी जेव्हा पाहिला तेव्हा त्यांनाही या व्हिडिओची भुरळ पडली. त्यांनी स्वत: या तरुणाच्या व्हिडिओसोबत आपल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या कलेची प्रशंसा केली आहे.

Bollywood Singer Abhijeet Bhattacharya share corona virus song of viral youth Tejas Gambhir
अभिजीत भट्टाचार्यांच्या 'या' सुप्रसिद्ध गाण्यावरुन तरुणाने तयार केलं कोरोना सॉन्ग, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Mar 21, 2020, 5:59 PM IST

मुंबई -जगभरात कोरोना विषाणूने दहशत पसरवली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी बऱ्याच उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तर, कोरोनावर आधारित गाणीही तयार करण्यात येत आहेत. रामदास आठवले यांच्या 'कोरोना गो' कवितेनंतर तर कोरोनावर गाणी तयार करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. अशातच सोशल मीडियावर एका तरुणाच्या कोरोना गाण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांसोबतच विविध सेलेब्रिटींनीही शेअर केला आहे.

तेजस गंभीर असे या तरुणाचे आहे. तेजस सोशल मीडियावर एक चांगला गायक आहे. त्याने कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी शाहरुख खानचा चित्रपट 'चलते चलते' चित्रपटातील 'सुनो ना सुनो ना' या गाण्याच्या चालीवर कोरोनावर आधारित गाणे तयार केले आहे. हे मूळ गाणे सुप्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी गायलेले आहे. तेजसने तयार केलेल्या गाण्याचे बोल 'कोरोना कोरोना ओ कोरोना' असे आहेत. या गाण्यातून त्याने नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी महत्वाचा संदेश दिला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेही वाचा -सहाबहार गाण्यातून नेहा कक्करने केले 'जनता कर्फ्यू'चे आवाहन

हा व्हिडिओ जेव्हा खुद्द अभिजीत भट्टाचार्य यांनी जेव्हा पाहिला तेव्हा त्यांनाही या व्हिडिओची भुरळ पडली. त्यांनी स्वत: या तरुणाच्या व्हिडिओसोबत आपल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या कलेची प्रशंसा केली आहे. तसेच, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

त्यांच्या या व्हिडिओवर आत्तापर्यंत लाखो प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच, या गाण्याचेही सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अभिनेत्री विद्या बालननेही तेजसचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा -कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिने तारे-तारकांचं आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details