धर्मशाला- अभिनेता आसिफ बसरा (वय 53) यांच्या आत्महत्येच्या बातमीनंतर बॉलिवूडमधून आश्चर्य आणि दुःख व्यक्त केले जात आहे. आसिफ यांनी हिमाचल प्रदेशमधील आपल्या भाड्याने रहात असलेल्या घरात आत्महत्या केली. या घरात ते गेली ४ वर्षे राहात होते. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आसिफच्या मृत्यूच्या बातमी कळल्यानंतर करिना कपूरने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जब वी मेट या चित्रपटात तिने आसिफ यांच्यासोबत काम केले होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, असे लिहित करिनाने श्रध्दांजली वाहिली आहे.
पोलिस अधीक्षक विमुक्त रंजन यांनी सांगितले की, आसिफ यांनी पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा वापरुन गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा - मुंबई-किनवट-मुंबई विशेष रेल्वेचा विस्तार आदिलाबादपर्यंत...!