महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पद्मभूषण 'खय्याम' यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोक

भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताची पक्की बैठक असलेले संगीतकार खय्याम यांचा सामाजिक कार्यातदेखील मोलाचा वाटा होता.अनेक गरजू कलावंतांसाठी खय्याम यांनी मदतीचा हात पुढे केला.

पद्मभूषण 'खय्याम' यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोक

By

Published : Aug 20, 2019, 12:46 PM IST

मुंबई- पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षाचे होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीच सुजय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आज याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीतातील तारा हरपल्याच्या भावना बॉलिवूडकरांनी व्यक्त केल्या आहेत.

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खय्याम यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी खय्याम यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहे. 'संगीतातील दिग्गज, मधुरभाषी, पवित्र आत्मा. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये आपले अमुल्य योगदान दिले आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गीतकार जावेद अख्तर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून खय्याम यांना आदरांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खैर यांनी लिहिलेय, 'खय्याम यांच्या निधनाचे फार दु:ख झाले. त्यांनी तयार केलेल्या धुन ऐकुनच आम्ही आयुष्याचे सर्व कठिण प्रसंग पार केले'.

ऋषी कपूर यांनीही ट्विट केले आहे.

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही त्यांच्या आठवणीत 'करोगे याद तो हर बात याद आएगी', असे ट्विट करुन आदरांजली वाहिली आहे.

'तुम्ही संगीतामध्ये नेहमी अजरामर राहाल', असे करण जोहरने म्हटलेय.

सोनम कपूर हिनेही खय्याम यांचे 'कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है' या गाण्याच्या ओळी शेअर करुन खय्याम यांना आदरांजली वाहिली आहे.

खय्याम यांना १९७७ मध्ये ‘कभी कभी’ आणि १९८२ मध्ये ‘उमराव जान’मधील संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्काराने, २००७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने आणि २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०१० मध्ये फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं.साठ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपट आणि ९ दूरदर्शन मालिकांना त्यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटांशिवाय खय्याम यांच्या अल्बम साँगलाही श्रोत्यांची तुफान पसंती मिळाली. यात 'पाव पडू तोरे श्याम', 'लोट चलो' आणि 'गजब किया तेरे वादे पे ऐतबार किया'सारख्या गाण्यांचा समावेश आहे.

भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताची पक्की बैठक असलेले संगीतकार खय्याम यांचा सामाजिक कार्यातदेखील मोलाचा वाटा होता.अनेक गरजू कलावंतांसाठी खय्याम यांनी मदतीचा हात पुढे केला. एवढंच नाही तर आपल्या नव्वदाव्या वाढदिवशी त्यांनी केपीजे संस्थेला १२ कोटींची रक्कम मदत म्हणून दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details