महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मोदींच्या २० लाख कोटी पॅकेजच्या वचनावरुन बॉलिवूडमध्ये दोन गट - शाहिद कपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यानंतर बॉलिवूड सेलेब्रिटींच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. अनुपम खेर, शाहिद कपूर, अनुराग कश्यप यांनी दिलेल्या प्रतिक्रियामुळे बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे.

बॉलिवूडमध्ये पडले दोन गट
Bollywood divided over PM'

By

Published : May 13, 2020, 3:23 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यानंतर बॉलिवूड सेलेब्रिटींच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते आणि तशाच त्या आल्याही. अनुपम खेर, शाहिद कपूर, अनुराग कश्यप यांनी दिलेल्या प्रतिक्रियामुळे बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे.

मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची नवी घोषणा केली. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडेल असा दावा करण्यात आला असून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग चोखाळण्याचे आवाहन पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केले होते.

अभिनेता अनुपम खेर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विचारांचे स्वागत करीत आपले विचार शेअर करताना लिहिलंय, "जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा केवळ देशच नाही तर संपूर्ण जग ऐकते आणि प्रेरणा घेते. जर सर्व 1.30 अब्ज भारतीयांनी स्वावलंबनाच्या मार्गाचे अनुसरण केले तर नक्कीच आम्हाला यश येईल."

अभिनेता आणि माजी खासदार परेश रावल यांनीही मोदी यांच्या विचारांचे समर्थन केले आहे. त्यांनी ट्विटरवर मोदींचे कौतुक करणारे ट्विट केले आहे.

अभिनेता शाहिद कपूरने मोदी यांचे भाषण प्रेरणादायी वाटल्याचे म्हटले आहे. आत्मनिर्भरतेच्या विचारांचेही त्याने समर्थन केले आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे आपल्या सडेतोड विचार मांडण्याबाबत ओळखले जातात. मोदी यांच्या भाषणाचा आढावा घेत त्यांनी काही ट्विट केली आहेत.

दरम्यान अनुराग कश्यप याने पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत करण्याची भूमिकेवर टीका करणारे ट्विट केले आहे. टीव्हीवर केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटालाही संधी समजून काम करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. भारत बलवान होण्यासाठी आर्थिक पॅकेज असल्याचे ते म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details