मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर, रिचा चढ्ढा, निम्रत कौर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीजनी रविवारी पार पडलेल्या जनता कर्फ्यूनंतर लोकांनी रस्त्यावरुन मिरवणुका काढल्या त्यावर जोरदार टीका केली आहे. कोरोना व्हायरसटचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी खास सूचना दिल्या जाऊनही लोकांनी त्याचे साफ उल्लंघन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहान जनतेला केले होते. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संध्याकाळी ५ वाजता सर्वांनी घराच्या खिडकीत किंवा गच्चीत येऊन टाळ्या आणि घंटानाद करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
असे असले तरी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोक मोठ्या संख्येने केवळ रस्त्यावर उतरले नाहीत तर त्यांनी मिरवणुकाही काढल्या. थाळ्या वाजवत, वाद्यांचा गजरात काहींनी डान्सही केला. काहींनी तर करोना गरबादेखील खेळला.
यासर्व गोष्टींवर निम्रत कौरने टीका करीत लिहिलंय, ज्या गोष्टीची चिंता वाटत होती नेमकी तिच गोष्ट या सेलेब्रिशनमध्ये असल्याचे या सर्कसच्या मानसिकतेतून दिसून आले. या भयानक आणि कधीही न बदलणाऱ्या कृत्याची किंमत आपण चुकती करीत आहोत आणि यापुढेही करावी लागेल.