'दिल से थँक्यू' : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे कलाकारांनी मानले आभार - दिल से थँक्यू
दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणा, वैद्यकीय कर्मचारी, अन्न पुरवठा करणारे कामगार आणि कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे बॉलीवूड कलाकारांनी आभार मानले आहेत.
!['दिल से थँक्यू' : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे कलाकारांनी मानले आभार Bollywood Celebrity Sharing post for thanking Corona Warriors](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6732269-719-6732269-1586486033333.jpg)
'दिल से थँक्यू' : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे कलाकारांनी मानले आभार
मुंबई -कोरोना विषाणूने जगभरात आपली दहशत माजवली आहे. सर्व जग सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही या विषाणूने थैमान घातले आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणा, वैद्यकीय कर्मचारी, अन्न पुरवठा करणारे कामगार आणि कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे बॉलीवूड कलाकारांनी आभार मानले आहेत.