मुंबई- १४ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदी जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. याच खास दिवसाच्या बॉलिवूड कलाकारांनीही ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा, बॉलिवूड कलाकारांनी दिल्या हिंदी दिनाच्या शुभेच्छा - best quotes on hindi day
अजय देवगणनं ट्विट करत म्हटलं, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा. हिंदी दिवसाच्या शुभेच्छा. यासोबत इतरही अनेक कलाकारांनी हिंदी दिनानिमित्त ट्विट शेअर केले आहेत.
अजय देवगणनं ट्विट करत म्हटलं, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा. हिंदी दिवसाच्या शुभेच्छा. तर रणदीप हुड्डानं बुरा जो देखन मैं चलया, बुरा ना मिलया कोय...जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा ना कोय..या प्रसिद्ध ओळी लिहित सर्वांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भाषा हे एक उत्तम साधन आहे. हिंदी दिवस साजरा करणे म्हणजेच आपल्या इंद्रधनुष्याप्रमाणे असलेल्या देशाची समृद्धता आणि विविधता यांच्याशी ओळख करुन घेणं आहे. चला याशिवाय इतर भाषादेखील शिकूया, असंही रणदीप पुढे म्हणाला. यासोबत इतरही अनेक कलाकारांनी हिंदी दिनानिमित्त ट्विट शेअर केले आहेत.