मुंबई- आज ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूड कलाकारांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात बॉलिवूडचा स्टायलिश अभिनेता वरूण धवन ते भाईजान सलमान खानपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे.
वरूण ते सलमान, बॉलिवूडच्या या कलाकारांनी चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा - सोनाली बेंद्रे
भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जिथे वेगवेगळ्या धर्माचे लोक एकोप्याने राहतात. चला जगाला दाखवून देऊया, मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा, असं वरुणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सुंदर देशातील माझ्या सर्व बंधू-भगिणींना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जिथे वेगवेगळ्या धर्माचे लोक एकोप्याने राहतात. चला जगाला दाखवून देऊया, मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा, असं वरूणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तर अभिनेता विवेक ओबेरॉयनंही चाहत्यांना शुभेच्छा देत देशभक्तीवरील एक कविता शेअर केली आहे. आज आपण स्वतंत्र आणि सुरक्षित आहोत, ते वर्दीत असलेल्या सीमेवरील आपल्या जवानांमुळे. या जवानांना आणि अभिनंदन यांच्यासारख्या खऱ्या हिरोंना माझा सलाम, असं विवेकनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय आमिर खान, सोनाली बेंद्रे, सोनम कपूर, सलमान खान आणि आयुष्मान खुराणासोबतच अनेक कलाकारांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.