मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेत्री रेणुका शहाणे, अभिनेत्री रिचा चढा, अभिनेत्री अमयरा दस्तुर, अभिनेता वीर दास यांच्यासह 11 बॉलिवूड सेलिब्रिटींना अवाजवी वीज बिलाचा शॉक बसला आहे. या सगळ्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
तापसी पन्नू, रेणुका शहाणे यांच्यासह अकरा बॉलिवूड सेलिब्रिटींना बसला अवाजवी विजबिलाचा शॉक - Tapasi Pannu latest news
बॉलिवूड सेलिब्रिटीना अवाजवी वीज बिलाचा शॉक बसला आहे. अनेकांनी दहापट वीजबिल जास्त आल्याने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रविवारी अभिनेत्री तापसी पनू हिने सगळ्यात आधी याबाबत आवाज उठवला. आपल्या ट्विटर अकाउंट वरून तिने मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या अदानी पॉवर कंपनीला माझं बिल एप्रिल महिन्यात ते 4,390 रुपये होतं, मे महिन्यात ते 3,850 होतं मग जून महिन्यात ते थेट 36, 000 म्हणजे दहा पट जास्त कसं? असा सवाल विचारला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना कंपनीने गेले तीन महिने लॉकडाऊन असल्याने मागील तीन महिने म्हणजे नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी थंडीचे दिवस असतात त्यांचे अॅव्हरेज बिल पाठवलं होतं. मात्र मार्च, एप्रिल, मे महिन्यात उन्हाळा वाढल्याने विजेचा वापरदेखील वाढला होता. त्यामुळेच तुम्हाला 36,000 रुपयांचे बिल आले जे योग्यच असल्याचं स्पष्टीकरण दिले आहे.
दुसरीकडे तापसी हिने आपला अन्य एक फ्लॅट आठवड्यात फक्त एकदाच स्वच्छता ठेवण्यासाठी उघडला जातो, मग त्याच बिल 570 रुपये कस..? असा प्रश्नदेखील विचारला होता. याबाबत कंपनीने मीटर रिडींग चेक करून उत्तर देऊ अस सांगितले आहे. तापसी प्रमाणेच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही अदानी पॉवरला दहा पट जास्त बिल आल्याबद्दल जाब विचारला आहे. रेणुका यांनादेखील 29 हजार 700 रुपयांचे बिल आले आहे, जे अवाजवी आहे, असे त्यांचे सांगणे आहे. असाच प्रॉब्लेम अभिनेता पुलकित सम्राट यालादेखील आला असून त्याला 30 हजार रुपयांचे विजेचे बिल आले आहे. या तिघाशिवाय अभिनेता वीर दास, अभिनेत्री रिचा चढा, अभिनेत्री नेहा धुपिया, टीव्ही अभिनेत्री सरिता कौशिक, टेनिसपटू ज्वाला गुटा, अभिनेता आशिष चौधरी, अभिनेत्री अमयरा दस्तुर यांनीदेखील दहापट वीजबिल जास्त आल्याने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.