कुल्लू - बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन वेब सीरिजच्या शूटिंगसाठी मनालीला पोहोचली आहे. स्थानिक समन्वयक अनिल कायस्थ यांनी ही माहिती दिली आहे. रवीना टंडन पुढील 40 दिवस मनाली व जवळील ठिकाणी शूट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रवीना टंडन मनालीमध्ये नवीन वर्षही साजरे करण्याची शक्यता आहे. या वेळी, तिने मनालीमध्ये पती आणि मुलांनाही बोलावले आहे. अनिल कायस्थ यांनी सांगितले की, बॉलिवूडमधील अनेक युनिट्सदेखील मनालीत बर्फवृष्टीची वाट पाहत आहेत.
हेही वाचा -अभिनेता अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा अडवाणी, वरुण धवन चित्रीकरणासाठी चंदीगडमध्ये
बर्फवृष्टी झाल्यास बॉलीवूडमधील अनेक युनिट्स मनालीकडे वळतील. नुकतीच शिल्पा शेट्टी हंगामा-2 या चित्रपटाच्या शूटिंगनंतर मुंबईत परतली आहे. दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनही पुन्हा येथे पोहोचत आहे. दुसरीकडे, भाजप खासदार कम बॉलिवूड अभिनेता सनी देओलदेखील सुट्टी साजरी करण्यासाठी मनालीला पोहोचले आहेत. अभिनेत्री कंगना रणौत राजस्थानच्या उदयपुरात आपल्या भावाचे लग्न उरकून लवकरच मनालीला पोहोचत आहे.
हेही वाचा -कंगनाचा भाऊ अक्षत जयपूरमध्ये रितूसह राजेशाही थाटात विवाहबद्ध