मुंबई - 'कबीर सिंह' चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर अभिनेत्री दिशा पटानी नव्या वाटेने मार्गक्रमण करीत आहे. तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. यात ती जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. यात ती बॉक्सींगसह किकही मारताना दिसत आहे.
कियारा आता आपल्या फिटनेसवर भर देताना दिसत आहे. ती नेहमी आपले जीमचे व्हिडिओ शेअर करीत असते. चाहते तिच्या या व्हडिओवर फिदा होत असंख्य कॉमेंट्स करीत असतात. या व्हिडिओचेही लोक भरपूर कौतुक करीत आहेत.
सध्या कियाराचा एक फोटोदेखील व्हायरल झाला आहे. त्यानंतर तिच्यावर टीकाकारही बरसले आहेत. या फोटोत कियाराने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर टीका करणाऱ्या ट्रोलर्सनी ड्रेसची तुलना मॅगीसोबत केली आहे.
'कबीर सिंह'ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर कियारा अडवणी लवकरच नव्या चित्रपटात झळकणार आहे. अक्षय कुमारसोबत ती 'गुड न्यूज' या सिनेमात काम करीत आहे. या चित्रपटात करिना कपूर आणि दिलजीत दोसन्ज यांच्याही भूमिका आहेत.
Conclusion: