नवी दिल्ली- माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केवळ राजकीयच नव्हे, तर जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बॉलीवूडकरांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत.
लता मंगेशकर
सुषमाजी यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून फार मोठा धक्का बसला आहे. एक संवेदनशील आणि निस्वार्थ नेत्या म्हणून त्या नेहमीच स्मरणात राहतील. संगीत आणि कवितेची त्यांना विशेष समज होती. माझी मैत्रीण आणि माजी परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची सदैव आठवण येत राहिल.
जावेद अख्तर, गीतकार
गीतकार जावेद अख्तर यांनी ट्वीट केले की, "सुषमा जी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. लोकसभेत संगीत बिरादरीचा तु्म्ही नेहमीच उत्कृष्टरीत्या बचाव केला. त्यामुळे आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू. तसेच, तुम्ही एक अद्भुत व्यक्ती म्हणून नेहमीच स्मरणात रहाल.
शबाना आझमी, चित्रपट कलाकार
शबाना आझमी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "सुषमाजी यांच्या निधनाबद्दल अतिशय दुःखद झाले आहे. भिन्न राजकीय विचारसरणी असूनही आमच्यात चांगली मैत्री होती. मी त्यांची नवरत्न आहे. असे त्यांनी त्यांच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कार्यकाळात मला म्हटले होते. तसेच, त्यांनी चित्रपटांना एक उद्योगाचा दर्जा देखील मिळवून दिला. त्या एक चपळ आणि मनमोकळ्या व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. "
सनी देओल, अभिनेता, खासदार
अभिनेता आणि भाजपचे खासदार सनी देओल यांनी ट्वीट मध्ये म्हटले की, "सुषमा जी यांच्या निधनाबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. त्या आपल्या देशातील एक उत्तम नेत्या म्हणून नेहमीच त्यांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पचवण्याची ताकद मिळो अशी प्रार्थना करतो.