मुंबई - काळवीट शिकारप्रकरणी निर्दोष सुटलेल्या कलाकारांना राजस्थान उच्च न्यायालयाने नव्याने नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम कोठारी आणि दुश्यंत सिंग यांना जोधपूरच्या सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले होते. तर सलमानला सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.
इतर कलाकारांना निर्दोष मुक्त केल्याने राजस्थान सरकारने जोधपूर सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे, आता राजस्थान उच्च न्यायालयाने या पाच जणांना नोटीस पाठवली असून आठ आठवड्यांनंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.