महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ट्रीपल एक्स सीरिज वाद; भाजप नेत्याने एकताविरोधात केली तक्रार दाखल - ट्रीपल एक्स सीरिज वाद

आवाना यांनी जयपूरच्या भट्टा बस्ती पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. आवाना म्हणाले, की या वेबसीरिजमधून एका सैनिकाच्या कुटुंबाचे चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण केले गेले आहे. सैनिकाच्या पत्नीचे चारित्र्य वाईट दाखवले गेले आहे. याच कारणामुळे अनेकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

bjp leader on ekta kapoor
एकताविरोधात तक्रार दाखल

By

Published : Jun 7, 2020, 6:47 PM IST

मुंबई- चित्रपट निर्माती एकता कपूर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण आहे ट्रीपल एक्स वेबसीरिज. या वेबसीरिजमधील एका सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यातून एकताने भारतीय सैनिकांचा अपमान केल्याचे म्हटले जात आहे. एकताला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. अशात आता भाजप नेते आंचल अवाना यांनी एकता कपूरविरोधात तक्रार दाखल केली आहे

अवाना यांनी जयपूरच्या भट्टा बस्ती पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. अवाना म्हणाले, की या वेबसीरिजमधून एका सैनिकाच्या कुटुंबाचे चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण केले गेले आहे. सैनिकाच्या पत्नीचे चारित्र्य वाईट दाखवले गेले आहे. याच कारणामुळे अनेकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण -

एकताच्या ट्रीपल एक्स या सीरिजमधील एका सीनमध्ये एका आर्मी जवानाची बायको त्याच्या अनुपस्थितीत भारतीय लष्कराचा गणवेश आपल्या बॉयफ्रेंडला घालण्यासाठी देते. त्यानंतर हा युनिफॉर्म फाडून ती बॉयफ्रेंडसोबत बेडवर जाते. याच सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला. दरम्यान आता हा सीन सीरिजमधून हटवला गेला असल्याचे एकताने स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details