महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 10, 2020, 2:54 PM IST

ETV Bharat / sitara

वाढदिवस विशेष : चाहत्यांच्या मनावर आधिराज्य करणारी सदाबहार रेखा

अभिनेत्री रेखा यांचा ६६ वा वाढदिवस आज साजरा होत आहे. गेली ५ दशके ती चाहत्यांच्या मनावर आधिराज्य करीत आहे. रेखा यांनी वयाची साठी ओलांडली असली, तरी आजही त्या इतर अभिनेत्रींना लाजवतील इतक्या फिट आणि सुंदर आहेत. त्यांची एनर्जी आणि सौंदर्याची चर्चा नेहमीच कलाविश्वात पाहायला मिळते.

REKHA BIRTHDAY-SPECIAL
सदाबहार रेखा वाढदिवस विशेष

मुंबई - आपल्या सदाबहार सौंदर्याने आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांचा जन्म १० ऑक्टोंबर १९५४ साली चेन्नई येथे झाला होता. हिंदीचा कोणताही लवलेश नसताना त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, सुरुवातीच्या काळात त्यांनाही बरेच चढ-उतार पाहावे लागले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात हे काही खास किस्से...रेखा या सुप्रसिद्ध अभिनेते जेमिनी गणेशन यांची मुलगी आहेत. त्यांची आई पुष्पावल्ली यादेखील तेलुगू अभिनेत्री होत्या. त्यामुळे रेखा यांना बालपणीच अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं.

सदाबहार रेखा वाढदिवस विशेष

१९६६ साली त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, रिल लाईफसोबतच रिअल लाईफमध्येही त्यांना अनेक धक्के पचवावे लागले.

आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये काही बी ग्रेड चित्रपटांचाही समावेश आहे.

'सावन भादो' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर त्यांचा 'प्राण जाये पर वचन न जाये' हा चित्रपट देखील चर्चेत आला होता. या चित्रपटात त्यांचा बोल्ड सीन फारच गाजला होता. त्याकाळी बोल्ड सिन्सची मोठी चर्चा होत होती. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

सदाबहार रेखा वाढदिवस विशेष

रेखा यांची सुरुवातीच्या काळात घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे अगदी कमी वयात त्यांनी चित्रपटात भूमिका साकारायला सुरुवात केली होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी तामिळ भाषेतील काही बी ग्रेड चित्रपटात भूमिका साकारल्या. बॉलिवूडमध्ये त्यांनी 'कामसुत्र' सारख्या इरॉटिक चित्रपटांमध्येही भूमिका केली आहे.एका चित्रपटामध्ये त्या लैंगिक शोषणालाही बळी पडल्या होत्या. त्यांच्या 'अंजाना सफर' या चित्रपटामध्ये एका रोमॅन्टिक गाण्याच्या सीनबद्दल त्यांना काहीही सांगण्यात आलं नव्हतं. मात्र, रेखा सेटवर आल्यानंतर दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटल्यावर यातील मुख्य नायक विश्वजीत यांनी त्यांच्यावर चुंबनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. सुरुवातील रेखा यांना आपल्यासोबत काय घडत आहे, हे समजलेच नाही. मात्र, जेव्हा त्यांना या सीनबद्दल समजले, तेव्हा त्या सेटवरच रडायला लागल्या होत्या. रेखा यांच्यावर लिहिण्यात आलेल्या 'रेखा - द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. पहिल्याच चित्रपटात बोल्ड सीनमुळे रडणाऱ्या रेखा यांनी पुढे मात्र, बऱ्याच चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारली होती.

सदाबहार रेखा वाढदिवस विशेष

रेखा यांनी वयाची साठी ओलांडली असली, तरी आजही त्या इतर अभिनेत्रींना लाजवतील इतक्या फिट आणि सुंदर आहेत. त्यांची एनर्जी आणि सौंदर्याची चर्चा नेहमीच कलाविश्वात पाहायला मिळते. विविध पुरस्कार सोहळ्यातही त्या आपल्या सौंदर्यांने सर्वांचं लक्ष वेधून घेतात.

ABOUT THE AUTHOR

...view details