मुंबईःअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज 11 ऑगस्ट रोजी आपला 35 वा वाढदिवस साजरा करीत आहे. श्रीलंकन ब्युटी जॅकलिनच्या चाहत्यांची संख्या श्रीलंकेतही भारताइतकीच प्रचंड मोठी आहे. 2006 साली जॅकलिनने मिस श्रीलंका युनिव्हर्सचे विजेतेपद जिंकले आहे. चित्रपटात दिसण्यापूर्वी जॅकलिन मॉडेलिंग देखील करायची. जॅकलिन बर्याच रॅम्प शोमध्ये दिसली आहे.
सुरुवातीपासूनच जॅकलिनचा अभिनय आणि चित्रपटांकडे कल होता. वयाच्या १४ व्या वर्षी तिने बहारीनमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जॅकलीनने सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. शिक्षण संपल्यानंतर तिने श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली.
२००९ मध्ये ती मॉडेलिंगच्या असाईनमेंटच्या संदर्भात भारतात आली. येथे आल्यावर, जॅकलिनने दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या 'अलादीन' या कल्पनारम्य चित्रपटासाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी जॅकलिन फर्नांडिज यांना २०१० मध्ये आयफाचा सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण आणि स्टारडस्ट पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी जॅकलिन हिंदी शिकली. याशिवाय तिला स्पॅनिश, फ्रेंच आणि अरबी भाषा माहित आहेत. जॅकलिनचा पहिला हिट चित्रपट मर्डर 2 (२०११) होता, त्यानंतर ती इंडस्ट्रीमध्ये परिचीत झाली. 'मर्डर 2' च्या यशानंतर पुढच्या वर्षी जॅकलिनचे 'हाऊसफुल 2' (२०१२) आणि 'रेस 3' (२०१३) हे चित्रपट आले. याशिवाय जॅकलिन २०१४ मध्ये सलमान खानसमवेत 'किक' चित्रपटात दिसली होती.