महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Birthday Special: जाणून घ्या, सलमानला कसे गेले २०१९ साल - सलमान खान वाढदिवस

सलमान खानचा आज वाढदिवस आहे. २७ डिसेंबर १९६७ ला जन्मलेला सलमान आज ५४ वर्षांचा झालाय. यंदाचे वर्ष संपत आलंय त्यामुळे हे वर्ष त्याला कसे गेले यावर एक नजर टाकूयात.

Salman Khan turn 54 today
सलमान खानचा आज वाढदिवस

By

Published : Dec 27, 2019, 11:33 AM IST


मुंबई - अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडमधील एव्हरग्रिन सितारा आहे. 'भाईजान', 'दबंग खान', 'टाइगर', 'सिकंदर', 'सुल्तान' असा अनेक नावानी त्याला चाहते प्रेमाने बोलवत असतात. त्याचे फॅन्स डोळ्यात प्राण आणून त्याच्या सिनेमाची वाट पाहात असतात. आज भाईजान सलमानचा वाढदिवस साजरा होतोय. २०१९ हे वर्ष त्याला कसे गेले यावर एक नजर टाकूयात.

यावर्षी ईदच्या सणाला त्याचा 'भारत' हा सिनेमा रिलीज झाली. नेहमी प्रमाणे लोकांनी सिनेमावर भरपूर प्रेम केले. केवळ ४ दिवसात १०० कोटी आणि १४ दिवसात २०० कोटीची कमाई 'भारत'ने केली.

भारत पोस्टर

संजय लीला भन्साळी यांच्यासोबत भाईजान सिनेमा करणार असल्याची चर्चा या वर्षात बरीच रंगली. 'इंशाअल्लाह' सिनेमात तो काम करणार अशी चर्चा सुरू झाली मात्र नंतर यावर पडदा पडला. दोघांमध्ये बिनसल्याचे बोलले गेले. सलमानला स्क्रिप्टमध्ये बदल हवे होते अशीही चर्चा होती. परंतु सलमानने नंतर खुलासा करीत आपल्यात आणि भन्साळीत मैत्रीचे संबंध असल्याचे जाहीर केले. 'इंशाअल्लाह' सिनेमात भन्साळींसोबत काम करणार असल्याचेही त्याने जाहीर केले.

जीममध्ये मेहनत करताना सलमान

सलमानचे जीम प्रेम सर्वांना परिचीत आहे. तो फिटनेससाठी नेहमी जीममध्ये घाम गाळतो. यावर्षी त्याने जीम इक्वीपमेंट्स 'बिईंग स्ट्रॉंग' या ब्रँडने लॉन्च केले.

काळवीट हत्या प्रकरणी जोधपूर न्यायालयात त्याच्यावर केस चालू आहे. यासाठी हजर राहताना जीवे मारण्याची धमकी त्याला एका गँगने दिली. बिष्णोई समाज त्याला कधीही माफ करणार नाही, असे म्हणत त्याच्या पोस्टरवर लाल फुली मारण्यात आली होती.

'बिग बॉस १३' शो बंद करण्यात यावा, यात लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जाते असे म्हणत काही संघटनांनी त्याच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न यावर्षी केला. इतकेच नाही तर 'दबंग ३' च्या शीर्षक गीतात भगवी वस्त्रे परिधान केलेल्या साधूच्या हातात गिटार दिसल्यामुळे सलमानवर आक्षेप घेतला.

'बिग बॉस'च्या घरात होत असलेल्या वर्तनामुळे सलमान खान वैतागला होता. हा शो सोडण्याचेही त्याने निर्मात्याला कळवले होते.

राधे फर्स्ट लूक

यावर्षी प्रमाणेच पुढील वर्षीही मनोरंजनचा मोठो पॅक चाहत्यांना देण्याचे सलमानने ठरवले आहे. २०२० च्या ईदला त्याचा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट रिलीज होणार आहे. याची झलक त्याने चाहत्यांसाठी दिली आहे. याचे शूटींग नोव्हेंबरमध्ये सुरू झाले आहे.

राधेच्या शूटींगला सुरुवात

यावर्षी २० डिसेंबरला रिलीज झालेला सलमानचा 'दबंग ३' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. १०० कोटी क्लबमध्ये पोहोचलेला सलमानचा ह १५ वा चित्रपट आहे. एकंदरी २०१९ हे वर्ष सलमान भाईजानसाठी लाभदायक ठरले. पुढील वर्षीही त्याच्याकडून अशी चाहत्यांची सेवा व्हावी या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

दबंग ३ पोस्टर

ABOUT THE AUTHOR

...view details